ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
प्रभाग १ मध्ये महायुतीची विजयी लाट;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग १ मध्ये महायुतीची विजयी लाट;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
7
6
4
8
6
प्रभाग १ मध्ये महायुतीची विजयी लाट;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक १ मध्ये महायुतीच्या प्रचारयंत्रणेने अक्षरशः धुवा उडवला आहे. गेली पंधरा ते २० वर्षे प्रभागाची सेवा करत विकासाचे शिल्पकार ठरलेले राजकारणातील पंडित पंडितराव जगदाळे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या उमेदवार सौ. मंजूषा प्रसाद देशमाने, तसेच नगराध्यक्षपदासाठीचे दमदार दावेदार विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा प्रचार आता शिखरावर पोहोचला आहे.

प्रभागातील प्रत्येक बोळाबोळातून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर भाजपाचे सच्चे कार्यकर्ते सूरज जगदाळे यांनी मतारांचे जनसंपर्क जास्त वाढला आहे.या निवडणुकीत महायुतीसाठी पोषक वातावरण आहे
महायुतीने प्रभागासाठी केलेल्या कामांसमोर विरोधकांचा गवगवा टिकणार नाही.
विकासाच्या मुद्द्यावर महायुतीने गेल्या वर्षांत राबवलेल्या कामांचा ठसा प्रभागाच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसतो. रस्ते, लाईट, पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांपासून ते गरजू कुटुंबांपर्यंत सर्व योजनांचा थेट लाभ पोहोचवणारे पंडित जगदाळे आणि सौ. देशमाने यांच्याबद्दल मतदारांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे.सूरज जगदाळे पुढे म्हणाले,“विनोद पिंटू गंगणे नगराध्यक्ष म्हणून आणि प्रभाग १ मधून पंडित जगदाळे व सौ. मंजूषा देशमाने नगरसेवक म्हणून निवडून येणे निश्चित आहे.
प्रभागातील मतदारांमध्येही या नेतृत्वाबद्दल प्रचंड समाधानाची भावना दिसत आहे. अनेक मतदारांचे स्पष्ट मत असे -“विकास हवा असेल तर महायुतीच हवी! विरोधकांना यावेळी जागा नाही.”
गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या कामांचा आरसा मतदारांसमोर ठेवताना पंडित जगदाळे व सौ. देशमाने यांनीही आश्वासन दिले की,“विकासाच्या कामात कधीच कमी पडणार नाही. प्रत्येक गरज पूर्ण करायची जबाबदारी आमची. प्रभाग क्रमांक १ मध्ये त्यामुळे आता एकच चर्चा – कामगिरीच्या आधारावर महायुती दणकट आणि बळकट दिसत आहे.

0
7
6
4
8
6



