तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींना मा.उच्च न्यायालयाकडून दिलासा;सर्वांचे जामीन मंजूर!
टिप: आदेशाची प्रत येणे बाकी आहे.
तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींना मा.उच्च न्यायालयाकडून दिलासा;सर्वांचे जामीन मंजूर!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील गाजलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या सर्व आरोपींना अखेर न्याय मिळाला आहे. दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी माननीय बॉम्बे उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपीठाने या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सर्व सहआरोपींचे प्रलंबित जामीन अर्ज मंजूर केले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, मुख्य आरोपीकडून जप्त करण्यात आलेले प्रमाण हे “कमर्शियल क्वांटिटी”पेक्षा कमी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच तपास पूर्ण होऊन चार्जशीट (अभियोगपत्र) दाखल झाल्याने आरोपींना पुढील काळात न्यायालयीन कार्यवाहीसाठी नियमित जामीनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा संपुष्टात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपींना न्याय मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांकडून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुटकेचा श्वास घेतला जात आहे.
प्रकरणातील प्रलंबित जामीन अर्ज निकाली काढण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे- माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, गटनेते संतोष परमेश्वर-कदम, राहुल परमेश्वर,संदीप राठोड, माजी प.स.उपसभापती शरद रामकृष्ण जमदाडे, संगीता गोळे,
विश्वनाथ (पिंटू) मुळे हा माजी सभापती मॅडमचा मुलगा आहे.,अमित (चिम्या) आरगडे आणि गजानन उर्फ हंग्या हंगरगेकर.
तपास संस्थेकडून या सर्वांविरोधात दाखल केलेले चार्जशीट न्यायालयात प्रलंबित असले तरी, जामीन मंजूर झाल्याने आरोपींना सशर्त स्वातंत्र्य मिळाले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, तपास पूर्ण झाल्यानंतर आणि पुरावे न्यायालयाच्या अखत्यारीत जमा झाल्यानंतर, आरोपींना दीर्घकाळ तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता उरलेली नाही.
स्थानिक स्तरावर या निर्णयावर मिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, या प्रकरणातील मुख्य अध्याय आता संपल्याचे संकेत कायदेतज्ज्ञांकडून दिले जात आहेत.



