ब्रेकिंगमहाराष्ट्र
लाच न स्वीकारल्याचा मुद्दा ठरला निर्णायक; भ्रष्टाचार प्रतिबंधक गुन्ह्यात आरोपीस जामीन
लाच न स्वीकारल्याचा मुद्दा ठरला निर्णायक; भ्रष्टाचार प्रतिबंधक गुन्ह्यात आरोपीस जामीन

0
6
7
8
4
1
लाच न स्वीकारल्याचा मुद्दा ठरला निर्णायक; भ्रष्टाचार प्रतिबंधक गुन्ह्यात आरोपीस जामीन
धाराशिव | प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व आनंद नगर पोलीस ठाण्याअंतर्गत नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक ४१६/२०२५ (कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम) प्रकरणात धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.आनंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नोंद झालेल्या या गुन्ह्यात ॲट्रोसिटी प्रकरणातील पीडितास शासनाकडून मिळणाऱ्या कॉम्पेन्सेशन संदर्भात लाच मागणी केल्याचा आरोप आरोपीवर होता. या तक्रारीच्या आधारे संबंधित प्रकरणात ट्रॅप लावण्यात आला होता; मात्र, तपासादरम्यान आरोपीने कोणतीही रक्कम स्वीकारलेली नसल्याचे समोर आले.सदर प्रकरणातील आरोपी रमेश मल्लू वाघमारे यांनी ॲड.विशाल प्रभाकर साखरे यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान ॲड.विशाल साखरे यांनी विविध कायदेशीर मुद्द्यांवर प्रभावी युक्तिवाद मांडला. आरोपीकडून रकमेचा स्वीकार न झाल्याचा महत्त्वाचा मुद्दा तसेच इतर बाबी विचारात घेत न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.या प्रकरणात ॲड.विशाल साखरे यांना ॲड.मंजुषा विशाल साखरे,ॲड .महेश लोहार,ॲड. अर्चना कांबळे,ॲड. शुभम तांबे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड. संकेत गोरे, ॲड.अमित गोळे तसेच ओंकार कोरेगांवकर, रोहित लोमटे, महेश पवार यांनी सहकार्य केले.न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंधित प्रकरणात आरोपीला मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा शहरात आहे.
0
6
7
8
4
1



