Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तब्बल १९ वर्षांनी भरली शाळा; नरेंद्र आर्य विद्यालयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा २००६ दहावी बॅचचा भावनिक स्नेहमेळावा; गुरूंचा सन्मान, मैत्रीचा उत्सव

0 7 6 5 0 5

तब्बल १९ वर्षांनी भरली शाळा; नरेंद्र आर्य विद्यालयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा

२००६ दहावी बॅचचा भावनिक स्नेहमेळावा; गुरूंचा सन्मान, मैत्रीचा उत्सव

तुळजापूर | प्रतिनिधी

अरे ओळखलंस का? काय करतोस आता? दहावीनंतर कुठे गेलास ? अशा असंख्य प्रश्नांनी आणि हसऱ्या आठवणींनी मौजे आपसिंगा येथील नरेंद्र आर्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुन्हा एकदा गजबजले. तब्बल १९ वर्षांनंतर २००६ च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले आणि शाळेचे प्रांगण आठवणींच्या उत्सवाने भरून गेले.नोकरी, व्यवसाय व संसाराच्या व्यापातून वेळ काढत लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे तसेच हैदराबाद येथून सुमारे ५० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांनी या स्नेहमेळाव्यात सहभाग घेतला. शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा देताना अनेकजण भावूक झाले.गुरूंचा सन्मान; शाळेप्रती कृतज्ञतेची भावना कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्याध्यापक जयराज सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपस्थित गुरूजनांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानामुळे वातावरण भारावून गेले.या वेळी शिक्षक बाळकृष्ण गोरे, तुकाराम गोरे, सुमित्रा खंदारे, शरद गोरे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.नरेंद्र आर्य विद्यालयाने दिलेले संस्कार आणि शिक्षणच आजच्या यशाचा पाया आहे,अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.शाळेसाठी सौर ऊर्जेवर चालणारा कॅमेरा भेट शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौर ऊर्जेवर चालणारा सुरक्षा कॅमेरा शाळेस भेट देण्यात आला. हा उपक्रम शाळेप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे प्रतीक ठरला. जिलेबीने वाढवली स्नेहमेळाव्याची गोडी सहाय्यक पोलीस निरीक्षक ताई हजारे यांच्या वतीने आयोजित सुस्वाद्य भोजनात गरम चपाती, पनीर, जिरा राईस, भजी आणि स्वीटमध्ये जिलेबीने सर्वांची पंगत गोड केली.जिलेबीने भोजनात रंगत आणली,असे म्हणत अनेकांनी आठवणींना विनोदी छटा दिली.व्हॉट्सॲप ग्रुपवरून स्नेहमेळाव्यापर्यंतचा प्रवास माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून एक महिना आधी नियोजन ठरवून हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यात आला.
कार्यक्रमासाठी सागर सिरसाठ, अर्जुन गोरे, ज्ञानेश्वर हेडे, शंकर गिरी, सुनील क्षीरसागर, शक्ती पांडागळे, समाधान पारधी, चंद्रकांत सोनवणे, नाना गादे, राहुल गुरव ,तसेच अजय सोनवणे, अविराज रोकडे (कामठा सरपंच), रामदास सरडे, नानासाहेब गादे, नागेश कोपे, शंभू पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. इतर बॅचसाठीही प्रेरणादायी उपक्रम हा स्नेहमेळावा सोशल मीडियावर चर्चेत आल्याने इतर बॅचचे माजी विद्यार्थीही अशा मेळाव्यांसाठी प्रेरित झाले आहेत. नरेंद्र आर्य विद्यालय हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, नाती जपणारी संस्कारशाळा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे