बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवून फसवणूक; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल !
बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवून फसवणूक; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल !
बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवून फसवणूक; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल !
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
जिल्हा परिषद बांधकाम विभाग, धाराशिव येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी एका ठेकेदाराविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश नवनाथ कोकाटे (रा.निपाणी,ता.भुम,जि. धाराशिव) याने सन २०२० ते २०२२ या कालावधीत जिल्हा परिषद बांधकाम विभागात कंत्राट व कंत्राटदार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी “वर्क डन” आणि “वर्क इन हॅड” अशी बनावट प्रमाणपत्रे व खोटी कागदपत्रे सादर करून संबंधित विभागाची फसवणूक केली.
या प्रकरणी उपकार्यकारी अभियंता विवेकराज विलासराव वायचळ (वय ५७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम-४२०,४६७, ४६८,४७१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर आनंदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.