भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रितू खोकर मैदानात; तुळजापूर शहरात वाहतूक व सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी..
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची तुळजापूर शहराची पाहणी
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची तुळजापूर शहराची पाहणी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आई श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक तुळजापूरात दाखल होत असल्याने शहरातील सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता यांची पाहणी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी केली.


या दौऱ्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ निलेश देशमुख,पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते. श्रीमती खोकर यांनी गर्दी नियंत्रणासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत नागरिकांना संयम व शिस्त राखण्याचे आवाहन केले. कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी “पोलिस अधीक्षक खोकर तुळजापूरनामा न्युज”शी बोलताना सांगितले.




