Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक : तीन दिवसांनंतर एकच अर्ज दाखल; अर्ज भरण्यासाठी उरले फक्त पाच दिवस!

प्रभाग क्रमांक दोन मध्ये इच्छुक उमेदवार औदुंबर कदम;"संधी दिली तर सोनं करीन”

0 7 6 4 8 6
तुळजापूर नगरपरिषद निवडणूक : तीन दिवसांनंतर एकच अर्ज दाखल; अर्ज भरण्यासाठी उरले फक्त पाच दिवस!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रभाग क्रमांक दोन मधील जनतेसाठी सदैव तत्पर, कार्यक्षम आणि विकासाभिमुख नेता म्हणून ओळख असलेले औदुंबर कदम यांनी पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी तयारी दर्शवली आहे.

तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली, तरी पहिल्या तीन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. अखेर चौथ्या दिवशी म्हणजेच दि. १३ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक २ मधील औदुंबर कदम यांनी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पहिला अर्ज दाखल करून निवडणुकीच्या शर्यतीला प्रारंभ दिला आहे.
निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत असून आता केवळ पाच दिवसच अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता घाई करावी लागणार आहे.
तुळजापूर नगरपरिषदेत एकूण ११ प्रभागांतून २३ नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. शहरात २९ हजारांहून अधिक मतदार असून, यंदाची निवडणूक चुरशीची होणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पहिल्या तीन दिवसांत अर्ज न आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. सध्या शहरात बंद खोलीतील बैठका, चर्चासत्रे आणि गटबाजीची राजकारण तापू लागले आहे. पुढील पाच दिवसांत किती अर्ज दाखल होणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

▪️बेबाकी प्रमाणपत्रासाठी उमेदवारांची गर्दी!

नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेल्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ३०३ जणांना बेबाकी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या आकड्याने इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील काही दिवसांत नामांकन प्रक्रियेत चांगलीच लगबग दिसणार आहे.
5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे