Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिव–तुळजापूरमध्ये निष्ठावंतांचा बळी; धनदांडग्यांना सत्तेची दारे खुले!

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची रणनीती; सर्वच पक्षांत गटबाजीची ठिणगी

0 7 6 4 8 6

धाराशिव–तुळजापूरमध्ये निष्ठावंतांचा बळी; धनदांडग्यांना सत्तेची दारे खुले!

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची रणनीती; सर्वच पक्षांत गटबाजीची ठिणगी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव–तुळजापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले असून, निष्ठा नव्हे तर निधी या एकाच सूत्रावर उमेदवारी वाटप सुरू असल्याचा आरोप होत आहे. निवडणूक आली की रात्रंदिवस पक्षासाठी झटणारा निष्ठावंत कार्यकर्ता आणि सत्ता आली की धनदांडगे व आयात नेते—हीच आजच्या राजकारणाची कटू वास्तवता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
निवडणूक रणधुमाळीत पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलत, निवडून येण्याची क्षमता आणि किती खर्च करू शकतो यालाच निकष मानले जात असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. यामुळे राजकारण हळूहळू सामान्यांचा आवाज हरवून श्रीमंतांची मक्तेदारी बनत चालल्याची भावना जोर धरू लागली आहे.

▪️आयात उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये संताप

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण ठराविक नेतृत्वाभोवतीच फिरताना दिसते. सामान्य घरातील, स्वबळावर उभा राहू पाहणारा कार्यकर्ता मोठा होऊ लागला की त्याला संभाव्य प्रतिस्पर्धी मानून पद्धतशीरपणे बाजूला सारले जाते—हेच नेतृत्व संपवण्याचे राजकारण असल्याची उघड टीका कार्यकर्त्यांकडून होत आहे.
बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने पक्षातील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले असून ही नाराजी आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. याचा थेट परिणाम मतदानावर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

▪️पक्षश्रेष्ठी नाराजी कशी दूर करणार?

याआधीही निष्ठावंतांना डावलल्याचे परिणाम अनेक निवडणुकांत सत्ताधाऱ्यांना भोगावे लागले आहेत. तरीही इतिहासातून धडा न घेता पुन्हा तीच चूक होत असल्याचे चित्र आहे. आता वाढती नाराजी शांत करण्यासाठी पक्षश्रेष्ठी कोणता तोडगा काढणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान की धनदांडग्यांची सत्ता—याच संघर्षात धाराशिव–तुळजापूरची निवडणूक रंगतदार व निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे