Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शून्यातून विश्व निर्माण करणारे दूरदर्शी उद्योजक- मा.श्री.बापूसाहेब उंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतकऱ्यांचा आधारस्तंभ- उद्योग विश्वासातील प्रेरणास्थान

0 7 6 4 8 6

🎂वाढदिवस विशेष🎂

शेतकऱ्यांचा आधारस्तंभ- उद्योग विश्वासातील प्रेरणास्थान!🌸

शून्यातून विश्व निर्माण करणारे दूरदर्शी उद्योजक- मा.श्री.बापूसाहेब उंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
धाराशिव जिल्ह्यातील उद्योगविश्वात विश्वास, प्रामाणिकपणा आणि श्रमसंस्कार यांचे प्रतिक बनलेले नाव म्हणजे “बाबा बायोमा ट्रेडिंग कंपनी”या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.बापूसाहेब उंडे यांनी गेल्या १५ वर्षांत आपल्या अथक परिश्रम,चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर एक छोट्या प्रयत्नातून उभारलेले हे उद्योग समूहाचे वटवृक्ष झाले आज ७० ते ८० युवकांना रोजगाराचे सोनेरी दालन उघडून देत आहे.

गोरगरिबांच्या अडचणींना आपल्या माणसांसारखे समजून नेहमी मदतीला धावून जाणारा, समाजकारण आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रात समतोल साधणारा हा नेता म्हणजेच बापूसाहेब उंडे.ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावाच्या विकासासाठी त्यांनी दाखवलेली बांधिलकी आजही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

सध्या कंपनीत ४० निष्ठावान कर्मचाऱ्यांची टीम बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, “पालन हार” या क्षेत्रात कंपनीने नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील युवकांमध्ये स्वावलंबन आणि उद्योगशीलतेची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.

उद्योग, समाजकारण आणि माणुसकी-या त्रिसूत्रीवर उभे असलेले बापूसाहेब उंडे यांचे व्यक्तिमत्त्व आज अनेकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहे.
आजच्या वाढदिवसानिमित्त-
ज्या हातांनी शेतकऱ्यांना आधार दिला,ज्या विचारांनी तरुणांना दिशा दिली आणि ज्या हृदयाने समाजाला आपल्या माणसांसारखे जपले- त्या बापूसाहेब उंडे यांना कोटी कोटी शुभेच्छा! 🎂✨
“शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या उद्योजकाला “तुळजापूरनामा न्यूज” संपादक ज्ञानेश्वर गवळी यांचा मानाचा मुजरा!”

  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

तुळजापूरनामा न्यूज पोर्टल,
तुळजापूरनामा न्यूज चॅनल संपादक : ज्ञानेश्वर गवळी- लटके, धाराशिव। तुळजापूर
मो.८८८८४४८८४१.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे