Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरात किराणा साहित्याचे वाटप; माजी नगरसेवक सुनील रोचकरी यांचा गेल्या ११ वर्षांपासूनचा उपक्रम !

तुळजापूरात किराणा साहित्याचे वाटप; माजी नगरसेवक सुनील रोचकरी यांचा गेल्या ११ वर्षांपासूनचा उपक्रम !

0 7 6 4 9 7

तुळजापूरात किराणा साहित्याचे वाटप; माजी नगरसेवक सुनील रोचकरी यांचा गेल्या ११ वर्षांपासूनचा उपक्रम !

तुळजापूर : प्रतिनिधी

सध्या महागाईने अक्षरशः कळस गाठला असून खाद्यपदार्थ, कपडे, मिठाईपासून ते भाज्यांपर्यंत सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने तुळजापूर शहरातील माजी नगरसेवक सुनील रोचकरी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत यंदाही किराणा साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला.

शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सुनील चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या भाऊबीज भेटीच्या कार्यक्रमात युवा नेते सुनील मधूकरराव चव्हाण यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मधील गोरगरीब व गरजू नागरिकांना गेली अकरा वर्षे सातत्याने किराणा साहित्याचे वाटप करून माजी नगरसेवक रोचकरी समाजसेवेचे उत्तम उदाहरण घालत आहेत.

उत्सव, सण किंवा कोणतेही सामाजिक कारण असो — सुनील रोचकरी हे नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातात, अशी त्यांची प्रभागात विशेष ख्याती आहे. मंकावती गल्ली, कवठेकर गल्ली, कासार गल्ली, पंढरपूरकर गल्ली, साळुंके गल्ली आदी भागांमध्ये त्यांनी सतत संपर्क ठेवत नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष दिले आहे. तसेच प्रभागातील विकासकामांसाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असतो.

या कार्यक्रमास सौ. प्रियंका रोचकरी, राजू काका प्रयाग, प्रदीप सुरवसे, वैभव वडगावकर, करण साळुंके, राहुल भालेकर, अभिजीत कदम, प्रतीक प्रयाग, श्रीकृष्ण साळुंके, ओंकार लसणे, बाळकृष्ण सराफ, पुरंजन कोंडो, परेश व्यास, अभिषेक साळुंके, विजय पाठक, संकेत कुलकर्णी, सचिन सुरवसे, विवेक साळुंके, तानाजी साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा आनंद सर्वांसोबत वाटण्याचा माजी नगरसेवक सुनील रोचकरी यांचा हा उपक्रम तुळजापूरात चर्चेचा विषय ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे