Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

माजी नगराध्यक्षांना धक्का! सचिन रोचकरींचा पराभव करत काँग्रेसचे आनंद जगताप ठरले “जायंट किलर” -३७८ मतांनी दिमाखदार एंट्री!

0 7 6 4 9 7

माजी नगराध्यक्षांना धक्का! सचिन रोचकरींचा पराभव करत काँग्रेसचे आनंद जगताप ठरले “जायंट किलर” -३७८ मतांनी दिमाखदार एंट्री!

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजपने एकूणच घवघवीत यश मिळवले असले, तरी काँग्रेसनेही काही प्रभागांमध्ये चांगली लढत दिली आहे. त्यातीलच सर्वाधिक चर्चेत असलेल्या हाय व्होल्टेज प्रभाग क्रमांक १० मध्ये काँग्रेसचे उमेदवार आनंद जगताप यांनी मोठा राजकीय उलटफेर घडवत भाजपचे दिग्गज, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचा ३७८ मतांनी पराभव केला. या विजयामुळे आनंद जगताप यांची नगरपरिषदेमध्ये दिमाखदार एंट्री झाली असून ते निवडणुकीतील ‘जायंट किलर’ ठरले आहेत.
२०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत आनंद जगताप यांना अत्यंत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी प्रचारासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने पराभव ओढवला होता. मात्र, तो पराभव मनात न ठेवता जगताप यांनी पुढील काळात सामाजिक कार्य, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि सातत्याने संपर्क यावर विशेष भर दिला.
यंदाच्या निवडणुकीत शहरातील सर्वात लहान पण तितकाच चुरशीचा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक १० मधून ते काँग्रेसकडून मैदानात उतरले. समोर भाजपचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे तगडे आव्हान असतानाही, लोकांचा विश्वास, केलेली कामे आणि प्रभावी जनसंपर्क याच्या जोरावर आनंद जगताप यांनी ही विजयश्री खेचून आणली.
या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून,शहरभरातून आनंद जगताप यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी नगराध्यक्षांचा पराभव आणि नव्या दमदार चेहऱ्याची एंट्री यामुळे प्रभाग क्रमांक १० चा निकाल तुळजापूरच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे