Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांना आंतरराष्ट्रीय ‘डिएससी’ पदवीने गौरव

तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांना आंतरराष्ट्रीय ‘डिएससी’ पदवीने गौरव

0 7 6 4 8 6

तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांना आंतरराष्ट्रीय ‘डिएससी’ पदवीने गौरव

तुळजापूर, : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’ कडून प्रतिष्ठेची ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स (डिएससी)’ ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या सन्मानामुळे तुळजापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. एस. राधाकृष्णन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर (ऑल इंडिया टीचर्स वेल्फेअर असोसिएशन) यांच्या विशेष शिफारशीनुसार घोडके यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांची निष्ठा, गुणवत्ता व नेतृत्वामुळे हा मान त्यांना मिळाला असल्याचे मानले जात आहे.दरम्यान, या उल्लेखनीय यशाबद्दल रोटरी क्लब तुळजापूर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष रो. संतोष लोखंडे, पुढील अध्यक्ष रो. अमर हंगरगेकर, पुढील उपप्रांतपाल रो. प्रशांत अपराध, तसेच रो. विष्णुदास अंबर, रो. अभिषेक जाधव आणि रो. तुषार सूत्रवे उपस्थित होते.घोडके यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे