ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
प्रभाग ७ मध्ये अंबरिश जाधव व सौ. अमृता दादासाहेब खपले यांची विजयी लाट? जनतेच्या ‘कमळा’वरील विश्वासाची प्रचिती!
प्रभाग ७ मध्ये अंबरिश जाधव व सौ. अमृता दादासाहेब खपले यांची विजयी लाट? जनतेच्या ‘कमळा’वरील विश्वासाची प्रचिती!
0
6
7
8
4
1
प्रभाग ७ मध्ये अंबरिश जाधव व सौ. अमृता दादासाहेब खपले यांची विजयी लाट? जनतेच्या ‘कमळा’वरील विश्वासाची प्रचिती!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रभाग क्रमांक ७ मध्ये तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची धुरळ्यात भर घालत भाजपाचे उमेदवार अंबरिश जाधव आणि सौ. अमृता दादासाहेब खपले यांच्या बाजूने प्रचंड जनसमर्थन एकवटले असून, “यांचा विजय निश्चित, आता मताधिक्य किती?” अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे.

लोकनियुक्त माजी नगरसेवक म्हणून कार्यकाळात जाधव यांनी केलेल्या अंमलात आणलेल्या विकासकामांनी मतदारांचा विश्वास मोठ्या प्रमाणात जिंकला आहे. पाणीपुरवठा सुधारणा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता मोहीम, शालेय सुविधा उभारणी, मूलभूत गरजांची पूर्तता—या सर्व क्षेत्रांत त्यांनी दाखवलेली धडपड नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. समस्यांवर त्वरित प्रतिसाद, थेट जनसंपर्क आणि कार्यपद्धतीतील पारदर्शकता यांमुळे मतदारांचा कल ठामपणे त्यांच्या बाजूने झुकला आहे.

अलीकडेच दादासासाहेब खपले यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रभाग ७ मधील राजकीय समीकरणे अक्षरशः उलटीपालटी झाली. या प्रवेशामुळे भाजपाची पकड आणखी मजबूत झाली असून विरोधकांच्या तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खपले यांची कार्यशैली, सामाजिक योगदान आणि प्रभागातील संपर्क क्षमता यामुळे भाजपाला मिळालेली ही मोठी वाढ आता थेट मतांमध्ये रुपांतरित होईल, असा जनतेचा विश्वास आहे.
दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील व विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या प्रयत्नातून प्रभाग ७ ला मिळालेल्या विविध विकास योजनांचा लाभ नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आहे. पायाभूत सुविधा, खेळाची साधने, समाजोपयोगी उपक्रम, आरोग्यविषयक कार्यक्रम या माध्यमातून तरुणाई आणि पालकवर्ग दोघांमध्येही भाजपाबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे. जाधव यांच्या कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीमुळे ही लाट अधिकच दृढ झाल्याचे चित्र दिसते.
सध्या प्रभाग ७ मध्ये जाधव–खपले यांची हवा जोरात असून जनमानसात एका प्रकारची ‘विजयपूर्व खात्री’ निर्माण झाल्याचे स्पष्ट जाणवते. विकास, कार्यक्षमता, विश्वास आणि जनतेशी असलेला थेट संवाद या चार आधारस्तंभांवर उभारलेली ही BJP लाट निकालापूर्वीच रंग दाखवताना दिसत आहे.
“प्रभाग ७ मध्ये कमळ फुलणारच… तेही प्रचंड मताधिक्याने!”
अशी भावना उमेदवारांच्या समर्थकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ठामपणे व्यक्त होत आहे.
0
6
7
8
4
1



