ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
एकनिष्ठेचा विजय; तुळजापूर काँग्रेसचा कणा ठरले किरण माणिकराव यादव

0
7
6
5
0
6
एकनिष्ठेचा विजय; तुळजापूर काँग्रेसचा कणा ठरले किरण माणिकराव यादव
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत जिथे अनेकांनी सोयीची भूमिका घेतली, तिथे काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष किरण माणिकराव यादव यांनी मात्र महाविकास आघाडीशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहून जोशात प्रचार करत काँग्रेसची मशाल तेजस्वी ठेवली. पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांची ताकद आणि मैदानात उतरून केलेला अथक प्रचार यामुळे ते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरले.निवडणुकीनंतर काँग्रेस विचारधारेवर विश्वास ठेवून विजयी झालेले नूतन नगरसेवक रणजित इंगळे,नूतन नगरसेवक अमोल जगताप,नूतन नगरसेवक आनंद मालक जगताप, नूतन नगरसेवक अक्षय कदम परमेश्वर व चिन्मय मगर यांनी जवाहर गल्ली, तुळजापूर येथे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष किरण यादव यांचा शाल-श्रीफळ देऊन भव्य व जंगी सत्कार करून त्यांचे योगदान अधोरेखित केले.यावेळी बोलताना नूतन नगरसेवकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,निवडणुकीच्या कठीण काळात किरण यादव हे महाविकास आघाडीचे खरे आधारस्तंभ ठरले. कोणत्याही दबावाला न जुमानता त्यांनी काँग्रेस विचारधारेशी निष्ठा राखली आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद दिली.
किरण यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. व्यक्तिगत लाभ-तोट्यापेक्षा पक्षाची विचारधारा मोठी आहे. आगामी काळात तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकसंधपणे काम करेल.हा सत्कार कार्यक्रम म्हणजे काँग्रेसमधील एकजुटीचे आणि निष्ठेचे जिवंत उदाहरण ठरला असून, येणाऱ्या राजकीय वाटचालीत किरण यादव यांची भूमिका अधिक ठाम आणि निर्णायक ठरणार, हे स्पष्ट झाले आहे.
0
7
6
5
0
6



