ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तामलवाडी : अवैध गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई;सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या निर्देशाने ९७ हजारांचा साठा जप्त

0
7
6
5
0
7
तामलवाडी : अवैध गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई;सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या निर्देशाने ९७ हजारांचा साठा जप्त
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात वाढत्या अवैध गुटखा विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी तामलवाडी पोलिसांनी प्रभावी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या निर्देशानुसार करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ९७,१४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मुद्देमाल जप्त केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील आरोपी रमेश नागनाथ गंजे यांच्या घरावर ४ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ४.२५ वाजता छापा टाकण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून बंदी असलेले डॉयरेक्टर पान मसाला, प्रिमियम टोबॅको, विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू आदी पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती तामलवाडी पोलिसांना मिळाली होती.
माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा घालत संपूर्ण अवैध मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टेकाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ही प्रभावी कारवाई तामलवाडी पोलिस नितीन भोसले, मनोज गोवाडे, उमेश माने, सूरज नरवाडे, गोपाल सलगर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत अवैध गुटखा व्यवसायावर मोठा आघात केला.
पोलीस प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांचे नियोजन व तत्परता विशेषत्वाने कौतुकास्पद ठरत आहे.
0
7
6
5
0
7



