ब्रेकिंगमहाराष्ट्र
ॲट्रॉसिटी व मारहाण प्रकरण : नगरसेवक अक्षय कदम परमेश्वर यांना अटकपूर्व जामीन
ॲट्रॉसिटी व मारहाण प्रकरण : नगरसेवक अक्षय कदम परमेश्वर यांना अटकपूर्व जामीन

0
7
6
4
9
6
ॲट्रॉसिटी व मारहाण प्रकरण : नगरसेवक अक्षय कदम परमेश्वर यांना अटकपूर्व जामीन
तुळजापूर : ॲट्रॉसिटी व मारहाण प्रकरणात नगरसेवक अक्षय कदम परमेश्वर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.तुळजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गु.र.नं. १७२/२०२६ कलम ११८(१), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम ३(१)(आर), ३(१)(एस) अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता.सदर प्रकरणात ॲड. संजय एच. पवार यांनी जिल्हा न्यायालयात अर्जदाराच्या बचावार्थ महत्त्वाचे मुद्दे मांडले. गुन्हा सार्वजनिक ठिकाणी घडलेला नसल्याचे, अर्जदाराकडून कोणतेही हत्यार अथवा वस्तू जप्त करावयाची नसल्याचे, तसेच अर्जदार हा नगरसेवक असून द्वेषापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे युक्तिवाद करण्यात आले.न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत अक्षय परमेश्वर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात ॲड. विराज जगदाळे यांनी कामकाज पाहिले.
0
7
6
4
9
6



