Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

प्रभाग क्र. 4 : अमृता ताई सुदर्शन वाघमारे यांच्या लोकसंपर्क आणि उपक्रमांची प्रभागात जोरदार चर्चा

प्रभाग क्र. 4 : अमृता ताई सुदर्शन वाघमारे यांच्या लोकसंपर्क आणि उपक्रमांची प्रभागात जोरदार चर्चा

0 6 7 8 4 1

प्रभाग क्र. 4 : अमृता ताई सुदर्शन वाघमारे यांच्या लोकसंपर्क आणि उपक्रमांची प्रभागात जोरदार चर्चा

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 4 मध्ये सौ. अमृता सुदर्शन वाघमारे यांच्या कार्यांची आणि उपक्रमांची व्यापक चर्चा सुरू आहे. प्रभागातील सर्वसामान्य नागरिक, विशेषत: महिला वर्गामध्ये त्यांच्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अमृता ताई यांनी गेल्या काही महिन्यांत विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला आहे. अष्टविनायक यात्रा, महिलांसाठी गौरी-गणपती आरास स्पर्धा, प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण, तसेच नागरी सुविधांशी संबंधित विविध कामांमुळे त्यांच्या नेतृत्वाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

प्रभागातील रस्ते, वीज, स्वच्छता आणि इतर मूलभूत गरजांवर त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रित केले असून अनेक प्रलंबित कामांना गती देण्याचे काम केले आहे. नागरिकांच्या तातडीच्या समस्या तत्परतेने सोडवण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ‘अमृता ताई म्हणजे विश्वास, काम आणि संपर्क’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

आगामी निवडणुकीत ताईंना व्यापक जनसमर्थन मिळत असून प्रभागातील सर्व स्तरांमध्ये “या वेळी मत त्यांनाच” असा विश्वास निर्माण झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे