Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपालिकेवर भाजपचे कमळफुल्ले! विनोद (पिटू) गंगणे नगराध्यक्ष; आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विकास धोरणाला जनतेची पसंती

विनोद (पिटू) गंगणे यांनी आमदारांच्या विकास धोरणेचे बांधले तोरण !

0 7 6 4 8 6
तुळजापूर नगरपालिकेवर भाजपचे कमळफुल्ले!
विनोद (पिटू) गंगणे नगराध्यक्ष; आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विकास धोरणाला जनतेची पसंती

विनोद (पिटू) गंगणे यांनी आमदारांच्या विकास धोरणेचे बांधले तोरण !
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगर परिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपचे उमेदवार विनोद विलासराव ऊर्फ पिटू गंगणे यांनी काँग्रेसचे उमेदवार अमर अशोकराव मगर यांचा पराभव करत १६८६ मतांची निर्णायक आघाडी घेत नगराध्यक्षपद पटकावले.
या अटीतटीच्या लढतीत

▪️ विनोद गंगणे – १२,२७२ मते
▪️अमर मगर – १०,५८६ मते
असा स्पष्ट जनादेश मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी अधिकृत निकाल जाहीर करताच शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विकासाचे तोरण तुळजापुरला बांधले! ही निवडणूक केवळ नगराध्यक्षपदापुरती मर्यादित न राहता, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विकासकेंद्री धोरणांवर जनता शिक्कामोर्तब करणारी ठरली, अशी प्रतिक्रिया नुतन नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांनी राजकीय वर्तुळात व्यक्त केली आहे.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी तुळजापूरचा विकास तुळजापूरशी जोडणारे ‘विकासाचे तोरण’ बांधण्याचा निर्धार निवडणुकीपूर्वीच मांडला होता. त्यालाच जनतेने भरभरून पाठिंबा दिला.

निवडणुकीतील ठळक वैशिष्ट्ये
▪️बिनविरोध निवड
प्रभाग क्र. ३ अ ,मधून भाजपच्या डॉ.अनुजा अजित कदम यांची बिनविरोध निवड.
▪️सर्वाधिक मतांचा विक्रम
प्रभाग ११ क मधील भाजपचे रामचंद्र सुखदेव रोचकरी – २१२४ मते तर प्रभाग ११ अ मधील सौ.अश्विनी विशाल रोचकरी – २००७ मते.

भाजपचे एकतर्फी वर्चस्व (प्रभाग १ ते ६) सुरुवातीच्या प्रभागांमध्ये भाजपने काँग्रेसवर मात करत स्पष्ट आघाडी घेतली.
सौ.मंजुषा देशमाने,पंडित जगदाळे, औदुंबर कदम, नीता क्षीरसागर, लखन पेंदे, सुनील रोचकरी, श्वेता साळुंखे, महंताबाई साठे, चंद्रशखर बाळासाहेब भोसले, सागर कदम व सौ. सरोजा अमृतराव यांनी विजय संपादन केला.मिश्र लढत (प्रभाग ७ ते ११)
या टप्प्यात काँग्रेसने काही ठिकाणी झुंज दिली असली तरी अखेर भाजपच सरस ठरला.
विशेषतः प्रभाग ११ अ, ब, क मध्ये भाजपने क्लीन स्वीप करत आपले वर्चस्व अधोरेखित केले.शहरात जल्लोष, अभिनंदनाचा वर्षाव निकाल जाहीर होताच शहरभर फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात भाजप समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद उर्फे पिटू गंगणे व सर्व विजयी नगरसेवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
▪️तुळजापूरच्या राजकारणात हा निकाल “विकास विरुद्ध आरोप”या लढतीत विकासाला मिळालेला कौल मानला जात असून,येत्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे