Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाई पतसंस्थेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात धाराशिव जिल्हाधिकारी यांना तीन लाखांचा धनादेश सुपूर्द

तुळजाई पतसंस्थेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात धाराशिव जिल्हाधिकारी यांना तीन लाखांचा धनादेश सुपूर्द

0 7 6 4 9 7
तुळजाई पतसंस्थेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात धाराशिव जिल्हाधिकारी यांना तीन लाखांचा धनादेश सुपूर्द

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासत तुळजापूर (खुर्द) येथील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था ने यंदाच्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या २८ सप्टेंबर रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत करण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार संस्थेच्या धर्मादाय निधीतून ३ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांना दि. ३ ऑक्टोबर रोजी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, व्हा. चेअरमन ताटे खंडू , संचालक मकसूद शेख, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील कर्मचारी नितीन पाटील, संस्थेचे व्यवस्थापक व सचिव संजय ढवळे तसेच कर्मचारी विकास भोजने उपस्थित होते.

तुळजाई पतसंस्था समाजकार्यात सदैव अग्रेसर राहिली आहे. यापूर्वी गुजरातमधील महाप्रलय, भूकंपग्रस्त क्षेत्र, तसेच कोविड-१९ च्या भीषण संकटकाळात संस्थेने मदतकार्य केले होते. २०१९ ते २०२१ दरम्यान नागरिकांना सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, मास्क तसेच ३०० नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले होते. धाराशिव येथे कोविड तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी संस्थेने रु. ५१,००० ची मदत दिली होती.

याशिवाय संस्थेतर्फे दरवर्षी नगरपरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, पशुवैद्यकीय शिबिरे अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. तुळजाई पतसंस्थेच्या या मदतीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे पुनश्च दर्शन घडले आहे.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे