ब्रेकिंगमहाराष्ट्र
प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे यांचा पंढरपूरकरांकडून सत्कार
भंडी शेगावचे सरपंच गणेश पाटील यांच्या हस्ते गौरव; मान्यवरांची उपस्थिती

0
7
6
4
8
7
प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे यांचा पंढरपूरकरांकडून सत्कार
भंडी शेगावचे सरपंच गणेश पाटील यांच्या हस्ते गौरव; मान्यवरांची उपस्थिती
तुळजापूर, : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी डॉ. श्रीरंग लोखंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगावचे सरपंच गणेश पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी योगशिक्षिका सौ. स्मिता गणेश शिंदे, उद्योजक रमेश शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस (अजितदादा पवार गट) सोलापूर जिल्हा पदाधिकारी सौ. वर्षा शिंदे, उद्योजक जितेंद्र नागणे, उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले, उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, डॉ. सतीश महामुनी, हनुमंत भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सरपंच गणेश पाटील यांनी, पंढरपूर तालुक्याचा मान वाढवणाऱ्या डॉ. लोखंडे यांचा सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती अधिक वेगाने होईल, अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही डॉ. लोखंडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0
7
6
4
8
7



