ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू रामदरा तलावाकडे पायी जात असताना भीषण अपघात
तुळजापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू रामदरा तलावाकडे पायी जात असताना भीषण अपघात

0
7
6
4
9
6
तुळजापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
रामदरा तलावाकडे पायी जात असताना भीषण अपघात
तुळजापूर : तुळजापूर शहराजवळील बायपास मार्गावर दुपारी २:३० च्या दम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मारुती नाना कसबे (वय २८, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मारुती कसबे हे रामदरा तलावाच्या दिशेने पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळत आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.मृत मारुती कसबे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, भावजई असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0
7
6
4
9
6



