Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कर्जमाफी मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? – आमदार कैलास पाटील यांचा थेट सवाल

कर्जमाफी मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? – आमदार कैलास पाटील यांचा थेट सवाल

0 7 6 4 9 7

कर्जमाफी मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? – आमदार कैलास पाटील यांचा थेट सवाल

धाराशिव, : मागील वेळी याच सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा कसा अनुभव आला हे सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे आताही अटी-निकष पूर्ण करताना पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवू नये. जोवर कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तोवर या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा असा थेट सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, शेतकरी अनुदान योजना पाहता तिथे अनुदान दिले जात नाही. त्यामुळे कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये शेती उत्पन्न घटल्याचे दिसून येत आहे. याच गतिमान सरकारने केलेली ही कामगिरी आहे. कोविड काळात जे क्षेत्र संजीवनी ठरले त्याच क्षेत्रासाठी पुढील काही वर्षांत सरकारची शेतकरीविरोधी धोरणे मारक ठरल्याचे दिसून आले आहे.
शिवाय या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेण्याची तयारी दर्शविली असताना मार्च २०२५ मध्ये कर्जवसुलीची सक्ती का केली? जे शेतकरी चालू बाकीमध्ये गेले त्यांची या सरकारने फसवणूक केली नाही का, असा प्रश्नही आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
मोठ्या उद्योगपतींसाठी ज्या प्रकारे गालिचा अंथरला जातो, तसा विचार शेतकरी, बेरोजगार आणि महिलांच्या बाबतीत का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लाडकी बहिण योजनेतून २१०० रुपये देण्याचे आश्वासन, भावांतर योजना तसेच जीएसटीमधून राज्य सरकारची करमाफी याबाबत सरकार बोलत नाही. मात्र शक्तीपीठ महामार्गाला विरोध असतानाही तो पूर्ण करण्यासाठी सरकार साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा वापर करत असल्याचे दिसून येते. यावरून सरकारची भूमिका स्पष्ट होत असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे