Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बोंबले चौकात किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणावर चाकूहल्ला, चुलत भावालाही मारहाण

बोंबले चौकात किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणावर चाकूहल्ला, चुलत भावालाही मारहाण

0 7 6 4 8 6

बोंबले चौकात किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणावर चाकूहल्ला, चुलत भावालाही मारहाण

तुळजापूर : शहरातील बोंबले चौक परिसरात मोटारसायकल बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून त्याच्यासोबत असलेल्या चुलत भावालाही मारहाण करण्यात आली आहे.मयुर बाळासाहेब पेंदे (वय ३५, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी दिलेल्या जबाबानुसार, दि. २२ मे २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचा चुलत भाऊ पंकज विठ्ठल पेंदे हे कारने जेवणासाठी धाराशिव रोडकडे जात होते. बोंबले चौक येथे हर्ष बालाजी सोनंजी यांनी मोटारसायकल रस्त्याच्या मधोमध उभी केल्याने त्यांनी हॉर्न वाजवून गाडी बाजूला घेण्यास सांगितले.यावरून आरोपी संतापला व “रस्ता तुझ्या बापाचा आहे का?” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कारवर बुक्क्यांनी मारहाण केली. वाद वाढत असल्याने मयुर पेंदे हे गाडीतून खाली उतरून समजावण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने धक्काबुक्की करत “आता तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.

फिर्यादीतनमूद केल्यानुसार आरोपीने पॅन्टच्या खिशातून चाकू काढून मयुर पेंदे यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. तसेच कान व गालावरही चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. मयुर यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या पंकज पेंदे यांच्यावरही आरोपीने छाती व हातावर वार करून जखमी केले.
घटनेचा आवाज ऐकून प्रशांत रामचंद्र पेंदे व सुदर्शन नानासाहेब पेंदे हे घटनास्थळी आले. त्यांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. जखमींना प्रथम विठाई हॉस्पिटल, तुळजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मयुर पेंदे यांना सोलापूर येथील यशोधरा सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढील उपचार सुरू आहेत.मयुर पेंदे यांच्या जवाबावरून हर्ष बालाजी सोनंजी (रा. खटकाळ गल्ली, तुळजापूर) याच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे हे करित आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे