Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

सराफ व्यावसायिक मधुकर शेळके यांची भारतीय नरहरी सेनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड

तुळजापूरच्या सामाजिक क्षेत्रात आनंदाची लाट

0 7 6 4 8 7

सराफ व्यावसायिक मधुकर शेळके यांची भारतीय नरहरी सेनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड

तुळजापूरच्या सामाजिक क्षेत्रात आनंदाची लाट

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले मधुकर बबनराव शेळके यांची भारतीय नरहरी सेना संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे यांच्या आदेशानुसार ही निवड जाहीर करण्यात आली.
या निर्णयास राज्य उपाध्यक्ष सुजितशेठ जगताप, समिती कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. विशालजी वेदपाठक, राज्य संपर्क प्रमुख अतुलजी पंडित, मराठवाडा अध्यक्ष राजेशजी टाक, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगदीशशेठ कांबळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष निलेशजी पंडित, राजारामशेठ पवार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोकुळशेठ लोळगे तसेच राज्य व जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांची एकमताने संमती देण्यात आली आहे.

समाजसेवा,धार्मिक व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असलेल्या मधुकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नरहरी सेनेचे संघटन अधिक मजबूत होईल,असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.ही माहिती संघटनेचे राज्य सचिव गणेश बनछोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे