ब्रेकिंगमहाराष्ट्र
शिरूर कासार येथे ‘हॉटेल हिंदवी’चे दिमाखात उद्घाटन; अमरराजे कदम यांच्या हस्ते पार पडला सोहळा.
अमरराजे कदम यांचे आवाहन : युवकांनी नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळावे

0
7
6
4
8
6
शिरूर कासार येथे ‘हॉटेल हिंदवी’चे दिमाखात उद्घाटन; अमरराजे कदम यांच्या हस्ते पार पडला सोहळा.
शिरूर कासार (बीड) : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या शिरूर कासार शहरातील काळेवाडी रोड परिसरात आज नव्या चवीची मेजवानी देणाऱ्या ‘हॉटेल हिंदवी’चा भव्य शुभारंभ करण्यात आला. एकनाथ कदम यांच्या या नूतन हॉटेलचे उद्घाटन धाराशिव जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख तथा श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अमरराजे कदम यांच्या शुभहस्ते आज मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी संपन्न झाले.शहरातील काळेवाडी रोडवरील या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अमरराजे कदम यांनी एकनाथ कदम यांच्या या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. तरुणांनी व्यवसायात उतरून प्रगती करावी आणि ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या उद्घाटन सोहळ्याला तुळजापूरवरून आलेले पुजारी विकास कदम (मलबा), तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक नवभारत-नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी, शशिकांत डाके,बीडचे भाऊसाहेब कदम (सर),चिमनराव कदम,प्रल्हाद कदम,राजेंद्र कदम, यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

हॉटेलचे संचालक एकनाथ कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले असून, ‘हॉटेल हिंदवी’च्या माध्यमातून खवय्यांसाठी दर्जेदार पदार्थांची रेलचेल उपलब्ध असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या नव्या हॉटेलमुळे शिरूर कासारमधील खाद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

0
7
6
4
8
6



