Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

किरकोळ वादातून महिलेचा गळा आवळून खून; आरोपीविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

किरकोळ वादातून महिलेचा गळा आवळून खून; आरोपीविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0 7 6 4 8 6

किरकोळ वादातून महिलेचा गळा आवळून खून; आरोपीविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तुळजापूर : शहरातील हनुमान नगर परिसरात किरकोळ भांडणातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गब्बर उर्फ वसिम दिलावर पठाण (रा. पापनास नगर, तुळजापूर) याच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत कस्तुरा गणेश पवार (वय ४०, रा. हनुमान नगर, तुळजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान आरोपीने किरकोळ भांडणाच्या कारणावरून मयत यांच्या राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये कशानेतरी गळा आवळून त्यांचा खून केला.या घटनेप्रकरणी तानाजी बापुराव साळुंखे (वय ४१, रा. एम.एस.ई.बी. बोर्डाजवळ, तुळजापूर) यांनी दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे हे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे