Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरात शिवसेनेची शक्तीप्रदर्शन रॅली; आकांक्षाताई चौगुलेंचा दमदार “महिला पॉवर” संदेश! शिवसेना तालुका प्रमुख अमोल जाधव “गेमचेंजर”

तुळजापूरात शिवसेनेची शक्तीप्रदर्शन रॅली; आकांक्षाताई चौगुलेंचा दमदार "महिला पॉवर" संदेश! शिवसेना तालुका प्रमुख अमोल जाधव "गेमचेंजर"

0 7 6 4 9 7

तुळजापूरात शिवसेनेची शक्तीप्रदर्शन रॅली; आकांक्षाताई चौगुलेंचा दमदार “महिला पॉवर” संदेश!

शिवसेना तालुका प्रमुख अमोल जाधव “गेमचेंजर”

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने सोमवारी काढलेली भव्य प्रचार रॅली प्रचंड उत्साहात पार पडली. ढोल-ताशांच्या गजरात, शिवसैनिकांच्या घोषणांनी दुमदुमणाऱ्या वातावरणात झालेल्या या रॅलीने शहरात निवडणूक तापल्या असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. प्रभाग क्रमांक १, २ आणि ८ मधील अधिकृत उमेदवारांना जनसमर्थन मिळवून देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.

या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाडा युवती प्रमुख आकांक्षाताई चौगुले यांची प्रमुख उपस्थिती. उमेदवारांना शुभेच्छा देताना त्यांनी “शिवसेना नेहमी जनतेच्या पाठीशी उभी राहिली असून येणाऱ्या काळातही विकासाचा ध्यास कायम राहील,” असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. रॅलीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांनीही प्रभागनिहाय प्रलंबित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या आश्वासनांची पुनरुच्चार केला.

तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी रॅलीचे मार्गदर्शन केले. प्रभागानुसार उपस्थित असलेले उमेदवार—
▪️ प्रभाग १अ : सुनिता प्रभाकर पाटील
▪️ प्रभाग २अ : मीनाताई सोमाजी
▪️ प्रभाग २ब : अजिंक्य खंदारे
▪️ प्रभाग ८अ : सुनिता अविनाश रसाळ
▪️ प्रभाग ८ब : सुनील हनुमंतराव घाडगे

सर्व उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह भव्य गर्दीत सहभागी झाले होते. शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, शहर संघटक नितीन मस्के यांसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या आणि शहरातील लाडक्या बहिणींची उत्स्फूर्त उपस्थिती रॅलीचे केंद्रबिंदू ठरली.

रॅलीदरम्यान भगवे झेंडे, घोषणांचा निनाद आणि उत्साहाने भरलेले वातावरण पाहून शिवसेनेचा प्रचार वेगाने जोम धरत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे