तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या समीकरणात;प्रभाग २ मधील नगरसेवीकापदासाठी सौ. निताताई क्षिरसागर यांचे नाव आघाडीवर
तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या समीकरणात;प्रभाग २ मधील नगरसेवीकापदासाठी सौ. निताताई क्षिरसागर यांचे नाव आघाडीवर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगराध्यक्ष पदाच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच तुळजापूर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदासाठी विनोद उर्फ पिटू गंगणे हे नाव सध्या शहरभर चर्चेत असताना, प्रभाग क्रं. २ मधून नगरसेवीकासाठी सौ. निताताई दिनेश (अण्णा) क्षिरसागर यांचे नाव नागरिकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

प्रभाग २ मध्ये गेल्या काही काळात मूलभूत गरजांची उभारणी,स्वच्छता,रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधांबाबत सौ.निताताई दिनेश क्षिरसागर यांनी दाखवलेली तत्परता आणि लोकाभिमुख दृष्टी नागरिकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसते.शहराच्या शाश्वत विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित होत असताना, उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याची भावना नागरिकांत स्पष्टपणे उमटत आहे.
पारदर्शक सुशासन, प्रामाणिक प्रशासन आणि नैतिक मूल्यांवर आधारित कार्यपद्धती या त्यांच्या प्रतिमेमुळे प्रभागात तसेच शहरात त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.आगामी काळात तुळजापूर शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे नेतृत्व उदयाला येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, त्यात सौ.निताताई दिनेश क्षिरसागर यांचे नाव ठळकपणे पुढे येताना दिसत आहे.



