Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

शेतकऱ्यांच्या वेदनेची थट्टा; आमदार कैलास पाटील यांची सरकारवर टीका…

0 6 7 8 4 1

शेतकऱ्यांच्या वेदनेची थट्टा; आमदार कैलास पाटील यांची सरकारवर टीका…

धाराशिव : प्रतिनिधी

अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत सरकारकडून कर्जमाफी आणि ठोस आर्थिक मदतीची आशा होती. मात्र, राज्य सरकारने दिलेलं पॅकेज हे केवळ आकड्यांचा दिखावा असून मदत तुटपुंजी आहे, अशी तीव्र टीका शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी केली.“ही मदत नसून शेतकऱ्यांच्या वेदनेची थट्टा आहे. सरकारने जमिनीवरील वास्तव पाहिलं असतं, तर आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर नसते,” असे आमदार पाटील म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, महायुती सरकार केवळ घोषणांपुरते मर्यादित राहिले असून शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष काहीच पडले नाही.आमदार पाटील यांनी शासनाला त्वरीत सर्वसमावेशक व न्याय्य मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे