तुळजापूर : भाजपात नवीन शक्तीची भर – युवा मोर्चा उपाध्यक्षपदी रत्नदीप लोंढे
तुळजापूर : भाजपात नवीन शक्तीची भर - युवा मोर्चा उपाध्यक्षपदी रत्नदीप लोंढे
तुळजापूर : भाजपात नवीन शक्तीची भर – युवा मोर्चा उपाध्यक्षपदी रत्नदीप लोंढे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील अनिश खपलेसह पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. भाजप कार्यालय, तुळजापूर येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात सर्व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत भाजपात काम करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

या सोहळ्यात युवाशक्तीला बळ देत रत्नदीप शहाजी लोंढे यांची तुळजापूर शहर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती आमदार राणाजगजितसिंह पाटील व विनोद (पिटू) गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष आनंद कंदले, युवा मोर्चा उपाध्यक्ष राजेश्वर कदम, सचिन कदम, सज्जन साळुंके, नानासाहेब डोंगरे, प्रतिक रोचकरी, प्रभाग क्र. ७ मधील उमेदवार अंबरिश जाधव, धर्यशील दरेकर, संदीप गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश सोहळा आणि युवा नेतृत्वाची झालेली नवीन नियुक्ती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी महत्त्वाची ठरणार, अशी चर्चाही शहरात रंगू लागली आहे. तुळजापूरच्या राजकारणात भाजपाने आणखी एक मजबूत पाऊल टाकल्याचे चित्र दिसत आहे.




