Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

रिपब्लिकन आठवले गटाचा काक्रंबा जि.प. गटात मशालला जाहीर पाठिंबा

रिपब्लिकन आठवले गटाचा काक्रंबा जि.प. गटात मशालला जाहीर पाठिंबा

0 7 6 4 8 6

रिपब्लिकन आठवले गटाचा काक्रंबा जि.प. गटात मशालला जाहीर पाठिंबा

तुळजापूर | तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद गट क्रमांक ३५ मध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ‍ॅड. रामचंद्र ढवळे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.तुळजापूर शहर अध्यक्ष आयु. वैजिनाथ पांडूरंग पांडागळे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय जाहीर करण्यात आला. जातीवादी राजकारणाला आळा घालण्यासाठी आणि समाजहिताच्या विचारांना बळ देण्यासाठी हा पाठिंबा देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. अ‍ॅड. रामचंद्र ढवळे यांनी समाजासाठी केलेले कार्य, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सातत्याने राबविलेले समाजप्रबोधनाचे उपक्रम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्यायाच्या विचारासाठी ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर काक्रंबा गटातील सर्व गावांतील आंबेडकरप्रेमी मतदारांनी मशाल चिन्हाला मतदान करून अ‍ॅड. ढवळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.याचबरोबर पंचायत समिती गटातील उमेश पांडागळे व सलगरा दिवटी गटातील शामसुंदर फुलमाळी यांनाही मशाल चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रिपब्लिकन आठवले गटाच्या या भूमिकेमुळे काक्रंबा गटातील निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.यावेळी वैजनाथ पंडागळे शहराध्यक्ष,सुभाष कदम, तानाजी कदम जिल्हा सहसचिव, धम्मशील कदम जिल्हा युवक कार्याध्यक्ष, प्रताप कदम जिल्हा उपाध्यक्ष, शुभम कदम, बाबासाहेब मस्के,जिल्हा कार्याध्यक्ष,विद्यानंद बनसोडे जिल्हाध्यक्ष, आनंद पांडागळे कार्याध्यक्ष,मराठवाडा प्रदेश,संजय बनसोडे सचिव,राजाभाऊ ओव्हाळ,राजाभाऊ सरवदे आदीसह जाहीर पाठिंबा देताना प्रसिद्धीपत्रकावर सह्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे