दारू तस्करीवर तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई;‘दारू’ने घातली अडचण पोलिस कारवाईत १३ हजारांचा माल केला जप्त
दारू तस्करीवर तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई;‘दारू’ने घातली अडचण पोलिस कारवाईत १३ हजारांचा माल केला जप्त
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तामलवाडी पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर छापा टाकत १३ हजार ६९० रुपयांची विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई गुरुवारी दि.२ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नजीर हाफीज बागवान (३२,पोलीस स्टेशन तामलवाडी) सरकारी तर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश राजेंद्र सुरवसे (३१,रा. सारोळा, ता. बार्शी,जि. सोलापुर) हा काटी येथे प्रशांत गावडे यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत परवानगीशिवाय बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या, बिअर कॅन असा एकूण १३,६९० रुपयांचा माल जप्त केला.
◾जप्त केलेला माल :
इम्पेरियल ब्ल्यू, एमसी डोवेल्स नं.१,रॉयल स्टॅग,ब्लॅक बकार्डी, ऑफिसर्स चॉईस,रॉयल ग्रीन, ब्लेंडर्स प्राईड,स्टर्लिंग रिजर्व आदी नामांकित कंपन्यांच्या व्हिस्की व रमच्या बाटल्या
ट्युबॉर्ग व किंगफिशर कंपनीच्या बिअरच्या बाटल्या व कॅन आरोपी सुरेश सुरवसे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा चोरटा व्यवसाय सुरु केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर,उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश देशमुख या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ.काझी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.



