ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर खुर्द येथे १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; परिसरात हळहळ
तुळजापूर खुर्द येथे १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; परिसरात हळहळ

0
7
6
4
8
6
तुळजापूर खुर्द येथे १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; परिसरात हळहळ
तुळजापूर : धाराशिव तालुक्यातील उंबरेगव्हाण येथील रहिवासी असलेल्या एका महिलेची मुलगी प्रमिला संजय दंडगुले (वय १५) हिने तुळजापूर खुर्द येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी उघडकीस आली. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास निदर्शनास आली.प्रमिलाची आई तुळजापूर येथील एका खाजगी दवाखान्यात नोकरी करत असून सध्या कुटुंब तुळजापूर खुर्द येथे वास्तव्यास होते. सकाळच्या सुमारास घरातील स्वयंपाकघरात प्रमिलाने टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला खाली उतरवून मदतीचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या घटनेमुळे तुळजापूर खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
0
7
6
4
8
6



