ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
धाराशिव ग्रामीण पोलिसांची कारवाई गुप्त माहितीच्या आधारे अवैध गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

0
7
6
4
9
7
धाराशिव ग्रामीण पोलिसांची कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे अवैध गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल
धाराशिव : प्रतिनिधी
राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर धाराशिव ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत एकास अटक केली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, हज्जु गफ्फार शेख (वय 40, रा. तालीम चौक, भारत विद्यालयाजवळ, धाराशिव) हा व्यक्ती बावी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जय भवानी हॉटेलसमोर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्याच्या ताब्यातील प्रतिबंधित लाल गोवा गुटखा, विमल पान मसाला, बादशाहा गुटखा, तंबाखू, डायरेक्टर पान मसाला तसेच बजाज सिटी 100 मोटारसायकलसह एकूण 83,610 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम 123, 223, 274, 275 अन्वये धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
7
6
4
9
7



