ब्रेकिंगमहाराष्ट्र
शेतजमिनीच्या फसवणुकीचा आरोप; नळदुर्ग पोलिसांत कारला येथील शेतकऱ्याची तक्रार
शेतजमिनीच्या फसवणुकीचा आरोप; नळदुर्ग पोलिसांत कारला येथील शेतकऱ्याची तक्रार

0
7
6
4
8
6
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील शेतकरी नवनाथ ज्ञानदेव आडेकर कुंबांनी आपली वडिलोपार्जित शेतजमीन फसवणुकीने बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत नळदुर्ग पोलीस ठाण्यात दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दाखल केली आहे. गट क्रमांक १३७ ही जमीन तीन पिढ्यांपासून आडेकर कुटुंबाच्या ताब्यात असून, आजतागायत या जमिनीचा प्रत्यक्ष उपभोगही त्यांच्याच कुटुंबाकडून घेतला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
आडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जमीन ही वडिलोपार्जित असून त्यावर त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा निर्विवाद कब्जा आहे. मात्र काही व्यक्तींनी संगनमत करून कोणतीही पूर्वसूचना न देता या जमिनीचा परस्पर खरेदी-विक्री व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही खरेदी फसवणुकीच्या मार्गाने करण्यात आल्याचे सांगत,“तीन पिढ्यांपासून आमची जमीन आहे आणि आमचाच तिच्यावर कब्जा आहे. फसवणूक करून ही जमीन खरेदी केली गेली आहे,”असे त्यांनी स्पष्ट केले आहे.तक्रारीनुसार, ज्ञानेश्वर श्रीनामे यांनी शेतात येऊन आडेकर कुटुंबाला जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच घराला कुलूप लावणे, शिवीगाळ करणे, धमकावणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय घरासमोरून मुद्दाम वाहनाने वारंवार फेऱ्या मारून दहशत निर्माण केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकारामुळे आडेकर कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित व्यक्तींपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीसांनी योग्य तो तपास करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी कुटंबाकडून होत आहे.
चॅनलवर्ती बातमी पहाण्यासाठी हि लिंक ओपण करा

0
7
6
4
8
6




