Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कदमवाडी हाणामारी प्रकरणात आरोपीला जामीन; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

कदमवाडी हाणामारी प्रकरणात आरोपीला जामीन; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

0 7 6 4 8 6

कदमवाडी हाणामारी प्रकरणात आरोपीला जामीन; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

तुळजापूर : तालुक्यातील मौजे कदमवाडी येथे सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामाच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणातील अटकेत असलेल्या एका आरोपीस धाराशिव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत फिर्यादीने सरकारी जमिनीवरील बांधकामाबाबत विचारणा केली असता आरोपीने संतापून शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यात विटेने प्रहार केला होता. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला होता. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती.दरम्यान, सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने ॲड. ओंकार नारायणराव मस्के यांनी प्रभावी युक्तिवाद करत गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब व फिर्यादीतील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यास ॲड. सोनाली नकाते मस्के व ॲड. रामानंद गुळमिरे यांनी साथ दिली.
सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे प्रकरणात नवे वळण आले असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे