Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

प्रभाग ७ मध्ये कमळाची जोरदार लाट! अंबरिश जाधव – सौ. अमृता खपले ‘विजयी’ दिशेने वाटचाल? भाजपच्या रणसंग्रामाला भव्य सभेची साथ

0 7 6 4 8 7

प्रभाग ७ मध्ये कमळाची जोरदार लाट! अंबरिश जाधव – सौ. अमृता खपले ‘विजयी’ दिशेने वाटचाल? भाजपच्या रणसंग्रामाला भव्य सभेची साथ

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर तुळजापूरमध्ये राजकीय वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपच्या उमेदवारांची जोरदार लाट उठल्याची चर्चा शहरभर रंगत आहे. अंबरिश जाधव व सौ. अमृता दादासाहेब खपले यांच्या नावाभोवती जनसमर्थनाचे घनदाट वलय तयार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या पाच वर्षांत प्रभागात झालेल्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा सुधारणा, ड्रेनेज कामे आणि स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यामध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याने विकासाचा मुद्दा प्रामुख्याने पुढे येत आहे. तरुण, महिला आणि व्यापारी वर्गाकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद अंबरिश जाधव आणि अमृता खपले यांच्या नावाला मजबुती देत आहे.

शहरभरात फिरणाऱ्या चर्चेनुसार, प्रभाग ७ मध्ये “कमळ फुलणार” हा सूर अधिकाधिक बुलंद होत आहे. घरगुती भेटीगाठी, कोपरा सभा आणि सोशल मीडियावरचा प्रचार यामुळे उमेदवारांनी जनतेशी दणदणीत संपर्क साधला आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मजबूत खांदे – प्रचाराला वेग

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठिंब्यामुळे प्रभाग ७ मधील प्रचारयुद्ध अधिक भक्कम झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून दररोज नव्या योजना आणि आश्वासनांमुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मतदारांचा विश्वास आमचा मोठा आधार – जाधव व खपले

प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे. जनतेने दाखवलेला विश्वास आम्हाला विजयाकडे नेणारा आहे,असे मत अंबरिश जाधव यांनी व्यक्त केले.महिला व कुटुंबियांच्या मूलभूत गरजांवर लक्ष देऊन प्रभागाला आदर्श बनवू,असा निर्धार सौ. अमृता खपले यांनी सांगितले.भव्य प्रचार सभा भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भव्य सभेत प्रभाग ७ मधील उमेदवारांना मिळणारे जनसमर्थन आणखी उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे