ब्रेकिंगमहाराष्ट्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर आगमन व स्वागत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर आगमन व स्वागत

0
7
6
4
8
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर आगमन व स्वागत
धाराशिव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज धाराशिव विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाले.आगमन प्रसंगी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांनी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी तर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरचिटणीस संतोष जाधव व कोषाध्यक्ष संतोष हंबीरे यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.

स्वागतानंतर उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी धाराशिव येथे आयोजित दैनिक पुण्यनगरी व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण केले.

0
7
6
4
8
6




