Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापुरातील कायदा-सुव्यवस्था ढासळली?; वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांविरोधात संताप

तुळजापुरातील कायदा-सुव्यवस्था ढासळली?; वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांविरोधात संताप

0 7 6 4 8 6

तुळजापुरातील कायदा-सुव्यवस्था ढासळली?; वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांविरोधात संताप

तुळजापूर : तुळजापूर शहरात वाढत्या खून, चोऱ्या, लूटमार आणि अवैध धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले आहे.


निवेदनात असे नमूद केले आहे की शहरात येणाऱ्या भाविकांची वाहने अडवून लूटमार, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी, भररस्त्यात मारहाण आणि जीवघेणे हल्ले वाढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच ड्रग्स, गांजा, दारू यांसारखे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून पोलिसांचा धाक उरलेला नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महिला, विद्यार्थीनी आणि बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ आळा घालावा तसेच शहरातील कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,आबासाहेब पाटील, अमर मगर, नगरसेवक अमोल कुतवळ, नगरसेवक रंजीत इंगळे,नागनाथ भांजे,श्याम पवार,नगरसेवक आनंद जगताप,बालाजी तट,चिन्मय मगर,आनंद रोचकरी,सुदर्शन वाघमारे,सुधीर कदम,टॉफिक शेख , युसूब शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे