Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सिद्धेश्वर वडगाव येथे घरफोडी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

सिद्धेश्वर वडगाव येथे घरफोडी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

0 6 7 8 4 1

सिद्धेश्वर वडगाव येथे घरफोडी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

तुळजापूर : धाराशिव तालुक्यातील सिद्धेश्वर वडगाव येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण प्रल्हाद माने (वय ३७, रा. सिद्धेश्वर वडगाव, ता. जि. धाराशिव) यांच्या राहत्या घराचा कडी-कोंडा दि.२७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १७५ तोळे चांदीचे दागिने, १२ किलो पितळी भांडी तसेच ७० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.या प्रकरणी फिर्यादी प्रविण माने यांनी दि.२८ मार्च २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे