Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरात जुगारविरोधी कारवाई; पानपट्टीवर छापा, आरोपीकडून ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

तुळजापूरात जुगारविरोधी कारवाई; पानपट्टीवर छापा, आरोपीकडून ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

0 7 6 4 8 7

तुळजापूरात जुगारविरोधी कारवाई; पानपट्टीवर छापा, आरोपीकडून ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुळजापूर : तुळजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जुगारविरोधी मोहिमेअंतर्गत दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरातील पानपट्टी येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत मिलन नाईट मटका जुगार खेळताना एक आरोपी आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव गोविंद भातलवंडे (वय ६०, रा. क्रांती हॉटेलच्या पाठीमागे, नळदुर्ग रोड, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हा जुने बसस्थानक, तुळजापूर येथील पानपट्टीजवळ जुगाराचे साहित्य जवळ बाळगून मटका जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून एकूण ९६० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगारप्रकारांविरोधात कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे