Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

विकास करणाऱ्यांनाच निवडा!” – संयोजनींचे मतदारांना आवाहन; तुळजापूरमध्ये आघाडीची ताकद दाखवली

अमर मगरांसह आघाडीचे सर्व उमेदवार मैदानात; रॅलीने तुळजापूरात रंगला प्रचारयुद्ध

0 7 6 4 9 7

विकास करणाऱ्यांनाच निवडा!” – संयोजनींचे मतदारांना आवाहन; तुळजापूरमध्ये आघाडीची ताकद दाखवली

अमर मगरांसह आघाडीचे सर्व उमेदवार मैदानात; रॅलीने तुळजापूरात रंगला प्रचारयुद्ध

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या प्रचाराला आता जोरदार वेग आला असून विविध पक्षांची नेतेमंडळी आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्नी सौ. संयोजनी ओमराजे राजेनिंबाळकर यांनी बुधवारी (दि. २६) तुळजापूर शहरात भव्य रॅली काढत मतदारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढलेल्या या रॅलीला तुळजापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीदरम्यान मतदारांना आवाहन करताना सौ. संयोजनी म्हणाल्या, “शहराचा खरा विकास करणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. पारदर्शक कारभारासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा द्या. तुम्ही दिलेला प्रत्येक मत हा तुळजापूरच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे.”

यावेळी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमर अशोकराव मगर हे विशेष उपस्थित होते. तसेच प्रभाग क्र. ०४ चे उमेदवार विनोद सोंजी व अमृता वाघमारे, प्रभाग क्र. ०९ चे उमेदवार मोनिका रसाळ व अमोल कुतवळ, तर प्रभाग क्र. ०८ चे उमेदवार रेखा पांडांगळे व अक्षय धनंजय कदम यांनीही नागरिकांचा अभिवादन स्वीकारत मतदारांशी संवाद साधला.

रॅलीदरम्यान नागरिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जोरदार प्रतिसाद देत समर्थनाचा शब्द दिला. तुळजापूरच्या विकासासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे