ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
डोअर-टू-डोअर प्रचारात महाविकास आघाडीची आघाडी; प्रभाग १० मध्ये बदलाची जोरदार हाक !तरुणांचा झुकलेला कल आनंद जगताप व सौ.धरती चिन्मय यांच्या बाजूने..
तरुणांचा झुकलेला कल आनंद जगताप व सौ.धरती चिन्मय यांच्या बाजूने..
0
7
6
5
0
5
डोअर-टू-डोअर प्रचारात महाविकास आघाडीची आघाडी; प्रभाग १० मध्ये बदलाची जोरदार हाक !

तरुणांचा झुकलेला कल आनंद जगताप व सौ.धरती चिन्मय यांच्या बाजूने..
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०मध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारयंत्रणेने अक्षरशः जोरदार आक्रमण चढवले असून संपूर्ण प्रभागात “महाविकास आघाडीची लाट” स्पष्टपणे जाणवत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद जगताप आणि सौ.धरती चिन्मय मगर यांच्या डोअर-टू-डोअर जनसंपर्क मोहिमेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधकांच्या समीकरणांमध्ये मोठी धांदल उडवणारा ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जगताप–मगर उमेदवारांची प्रभागातील प्रत्येक वस्ती, गल्ली-बोळ, चौक, समाजघटक याठिकाणी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणींची सविस्तर पाहणी केली. पाणीपुरवठा, रस्ताविकास, निचरा समस्या, स्वच्छता, महिला सुरक्षा, तरुणांच्या रोजगाराच्या संधी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा—या सर्व मुद्द्यांवर नागरिकांशी सखोल चर्चा करत “प्रामाणिक व उत्तरदायी प्रशासनाचा” शब्द उमेदवारांनी दिला. नागरिकांनीही अनेक वर्षे रखडलेल्या कामांबाबत मोकळेपणाने मत मांडत बदलाची तीव्र इच्छा व्यक्त केली.

विशेषतः तरुणांमध्ये आनंद जगताप यांचा आधुनिक, पारदर्शी आणि विकासाभिमुख रोडमॅप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. तर महिला मतदार वर्गातून सौ. धरती मगर यांना व्यापक प्रतिसाद मिळत असून “बदल हवा, विकास हवा” असा सूर घराघरातून उमटताना दिसत आहे. यामुळे प्रभागातील वातावरण आघाडीच्या बाजूने झुकल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
प्रचारयंत्रणेतील कार्यकर्त्यांचा उत्साह, संघटनेची काटेकोर शिस्त आणि उमेदवारांचा सर्वसमावेशक संवाद—या त्रिसुत्रीच्या जोरावर महाविकास आघाडीने प्रभाग १० मध्ये भक्कम पकड निर्माण केली आहे. आगामी निवडणुकीत या प्रभागात महाविकास आघाडीला निर्णायक आघाडी मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात असून प्रभागातील उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत.
0
7
6
5
0
5



