Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

घरफोडीचा प्रकार उघड; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

0 7 6 4 8 7

घरफोडीचा प्रकार उघड; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

तुळजापूर : प्रतिनिधी

मसला खुर्द येथील प्रदीप कुंडलिक साळवे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे १ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी प्रविण कुंडलिक साळवे (वय ३२, रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता ते २७ ऑक्टोबर पहाटे ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून त्यातील २४ सोन्याचे तसेच काही चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
या प्रकरणी प्रविण साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे