Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापुरात रविवारी ‘तुळजाई रोटरी मॅरेथॉन’; काही मार्गांवर वाहतूक बदल

तुळजापुरात रविवारी ‘तुळजाई रोटरी मॅरेथॉन’; काही मार्गांवर वाहतूक बदल

0 6 7 8 4 1

तुळजापुरात रविवारी ‘तुळजाई रोटरी मॅरेथॉन’; काही मार्गांवर वाहतूक बदल

तुळजापूर : तुळजापूर येथे दि. 15 मार्च 2026 रोजी सकाळी 06:00 ते 09:00 या कालावधीत शहरात तुळजाई रोटरी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 3 कि.मी., 5 कि.मी. व 10 कि.मी. अशा तीन टप्प्यांत होणार असून स्पर्धेची सुरुवात तुळजापूर तालुका क्रीडा संकुल येथून होणार आहे.10 कि.मी. स्पर्धेचा मार्ग तुळजापूर क्रीडा संकुल – सावरकर चौक – जुने बसस्थानक समोरून मलबा हॉस्पिटल – अपसिंगा कॉर्नर – धाराशिव ब्रिज बाजूचा सर्विस रोड – सोलापूर हायवे लगतचा सर्विस रोड – बार्शी टी पॉईंट – तुळजापूर घाट छत्रपती शिवाजी महाराज चौक – सावरकर चौक – तालुका क्रीडा संकुल असा राहणार आहे.
स्पर्धेदरम्यान धुळे–सोलापूर महामार्गावरील धाराशिवकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक तुळजापूर शहराजवळील धाराशिव रोड उड्डाण पुल ते सिंदफळ चौक या दरम्यान एका बाजूने बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक धाराशिव ब्रिज बायपास मार्गे काक्रंबा चौक ते सिंदफळ चौक या मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.दि. 15 मार्च रोजी सकाळी 06:45 ते 09:15 या कालावधीत हा वाहतूक बदल लागू राहणार असून या ठिकाणावरून कोणतीही वाहने जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामन दलाची वाहने व रुग्णवाहिका यांना या मार्गावर प्रवेश देण्यात येईल.ही मॅरेथॉन स्पर्धा शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये तुळजापूर येथील मॅरेथॉन स्पर्धा बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक अधिकार प्रदान केले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे