Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

छायाचित्र व्हायरलची धमकी देत विवाहितेवर दीर्घकाळ अत्याचार; धाराशिव ग्रामीण भाग हादरला

छायाचित्र व्हायरलची धमकी देत विवाहितेवर दीर्घकाळ अत्याचार; धाराशिव ग्रामीण भाग हादरला

0 7 6 4 8 6

छायाचित्र व्हायरलची धमकी देत विवाहितेवर दीर्घकाळ अत्याचार; धाराशिव ग्रामीण भाग हादरला

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ३६ वर्षीय विवाहित महिलेवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहाराचे कारण पुढे करत तसेच खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत गावातीलच एका तरुणाने जुलै २०२४ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला दबावाखाली ठेवले. या भीतीच्या वातावरणात तिचे शोषण करण्यात आले. एवढेच नव्हे तर आरोपीने पीडितेची खासगी छायाचित्रे तिच्या मुलीच्या इन्स्टाग्राम खात्याचा गैरवापर करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे पीडितेला तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागला.या प्रकरणी पीडित महिलेने २९ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१)(२)(एम), ३५१ (२)(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६-ब, ६६-ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे