Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

येरमाळ्यात गावठी दारूवर पोलिसांचा हल्लाबोल;सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव यांची अक्रमक कारवाई;अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ

येरमाळ्यात गावठी दारूवर पोलिसांचा हल्लाबोल;सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव यांची अक्रमक कारवाई;अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ

0 6 7 8 4 1

येरमाळ्यात गावठी दारूवर पोलिसांचा हल्लाबोल;सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव यांची अक्रमक कारवाई;अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ

येरमाळा : प्रतिनिधी

येरमाळा पोलिसांनी अवैध मद्यनिर्मितीवर मोठी कारवाई करत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा गुळमिश्रीत रासायनिक द्रव व तयार दारूसह सुमारे २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आश्रुबा अभिमान पवार (वय २५,रा.येरमाळा,ता.कळंब, जि.धाराशिव) हा दि.१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाहेद फुडच्या बाजूस पत्र्याच्या शेडसमोर अवैधरित्या दारू निर्मितीचे साहित्य साठवून ठेवत होता. पोलिसांनी धाड टाकून २०० लिटर गुळमिश्रीत रासायनिक द्रव आणि ६५ लिटर तयार गावठी दारू जप्त केली.

या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या अक्रमक पद्धतीमुळे परिसरातील अवैध धंदेवाले सावध झाले असून दारूधंद्यावर पोलिसांच्या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे