Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव जलसंधारण विभागात ‘गाळ’ नव्हे तर ‘गैरव्यवहारांचा डोंगर’!

मृद व जलसंधारण विभागात “गाळ” नव्हे तर “असंख्य घोटाळा”!

0 7 6 4 8 6

धाराशिव जलसंधारण विभागात ‘गाळ’ नव्हे तर ‘गैरव्यवहारांचा डोंगर’!

मृद व जलसंधारण विभागात “गाळ” नव्हे तर “असंख्य घोटाळा”!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळुंके यांनी दिलेल्या लेखी निवेदनामुळे मृद व जलसंधारण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे!

साळुंके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की — जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाची जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असून, उलट पैसे देण्याचं आमिष दाखवलं गेलं.

त्याहून गंभीर म्हणजे — कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या भावांच्या व नातेवाईकांच्या नावेच कार्यारंभ आदेश काढून गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेतील कामे आपल्याच गोटात फिरवली!

साळुंके यांच्या म्हणण्यानुसार, पिके महामुनी अधिकारी मगरूर झाले असून पैशाच्या बळावर कायद्याचा दुरुपयोग करून स्वतःची झोळी भरत आहेत!

या आरोपांमुळे मृद व जलसंधारण विभागाचा गाळ भ्रष्टाचाराच्या दलदलीत खोलवर साचल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आता जिल्हाधिकारी पुजार या प्रकरणाची तपासणी करून दोषींवर कारवाई करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवेदनावर रवींद्र साळुंके यांचे स्वाक्षरी आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे