ब्रेकिंगमहाराष्ट्र
सत्ता महत्त्वाची; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
सत्ता महत्त्वाची; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

0
7
6
4
8
6
सत्ता महत्त्वाची; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव : जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच शिवसेनेत एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धाराशिवमध्ये सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर बोलताना सरनाईक म्हणाले की, सत्तेसाठी पक्षात मतभेद निर्माण होणे योग्य नाही. शिवसेना ही विचारांची व कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असलेली संघटना आहे. त्यामुळे पक्षात फूट पडू देणे कुणालाही मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.प्रसंगी आम्हाला विरोधी बाकांवर बसावे लागले तरी चालेल; मात्र शिवसेनेची एकजूट अबाधित ठेवणे हेच आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. कार्यकर्त्यांनीही अफवांवर विश्वास न ठेवता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान, जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पुढील काळात राजकारण आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
7
6
4
8
6



