Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

माजी आमदार राजाभाऊ राऊत यांना विधान परिषदेत संधी द्या; जयवंतराव जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे जोरदार मागणी

"अनुभवी नेतृत्वाला सभागृहात संधी द्या"—जगताप यांची ठाम भूमिका 

0 7 6 5 0 5

सोलापूर जिल्ह्यात राजकीय चर्चांना वेग, राऊतांच्या नावाची जोरदार चर्चा

मे महिन्यात विधान परिषदेसाठी नऊ जागा रिक्त; राऊत यांच्या नावाला बळ

करमाळा । अविनाश जोशी

बार्शीचे माजी आमदार राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ राऊत यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी ठाम आणि जोरदार मागणी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली आहे. येत्या मे महिन्यात विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या सुमारे नऊ जागा रिक्त होत असून, त्यामध्ये राजाभाऊ राऊत यांचा समावेश व्हावा, यासाठी जिल्ह्यातील समविचारी नेत्यांचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात राजाभाऊ राऊत यांच्याकडे संघर्षातून उभे राहिलेले आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिले जाते. विधानसभा निवडणुकी दरम्यान काही अपप्रचारामुळे त्यांचा पराभव झाला असला, तरी तो जनतेच्या विश्वासाला तडा देणारा नव्हता, हे नंतरच्या निवडणुकांतून स्पष्ट झाले आहे. बाजार समिती, नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनतेने राऊत यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत आपली “चूक दुरुस्त” केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.जिल्ह्यातील विविध विचारधारांतील नेत्यांना एकत्र आणण्याची क्षमता, संघटन कौशल्य आणि विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका ही राऊत यांची ओळख आहे. दुष्काळ, पाणीप्रश्न, शेती, शिक्षण आणि नागरी सुविधांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला असून, त्यांच्या कामाची दखल आजही सर्वपक्षीय स्तरावर घेतली जाते. त्यामुळे अशा अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्वाला विधान परिषदेसारख्या सभागृहात संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले.सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना राऊत यांच्यासारखे नेतृत्व निराश होऊ नये. त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी विधान परिषदेत संधी देणे ही काळाची गरज आहे,असे जगताप म्हणाले. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील समविचारी नेत्यांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी औपचारिकपणे मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राजकीय वर्तुळात या हालचालींमुळे चर्चेला वेग आला असून, राजाभाऊ राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता मुख्यमंत्र्यांचा निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे